Mumbai, फेब्रुवारी 9 -- Chhaava Advance Booking : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची ही प्रतीक्षा १४ फेब्रुवारीला संपणार आहे. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. विकी कौशलचा हा चित्रपट चांगली कामगिरी करू शकतो, असे मानले जात आहे. आगाऊ तिकीट बुकिंग सुरू होऊन २४ तासांतच ओपनिंग डेसाठी १८ हजार तिकिटे विकली गेली आहेत. बुक माय शोनुसार, २६२ हजार लोकांनी हा चित्रपट पाहण्यात रस दाखवला आहे.

sacnilk.com ने दिलेल्या माहितीनुसार, ॲडव्हान्स बुकिंग सुरू होऊन २४ तासांपेक्षा कमी कालावधीत पहिल्या दिवसाची १८ हजार तिकिटे विकली गेली आहेत. रिपोर्टनुसार, रविवारी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत या चित्रपटाने प्री-सेल्समध्ये १.५४ कोटी रुपये (ब्लॉक सीटसह) कमावले आहेत. विकी कौशलचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरे...