Mumbai, मे 21 -- Chaturmas 2024 Start Date : हिंदू धर्मात चातुर्मासाचे विशेष महत्त्व आहे. चातुर्मास सुरू होताच सर्व शुभकार्य थांबवले जातात. धार्मिक मान्यतांनुसार, चातुर्मास सुरू होताच भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात.

यानंतर देवूठाणी एकादशीच्या दिवशीच भगवान नारायण जागे होतात. देवूठाणी एकादशीला चातुर्मास संपतो. चला तर मग जाणून घेऊया या वर्षी चातुर्मास कधी सुरू होत आहे आणि या काळात शुभ कार्ये का वर्ज्य आहेत.

Vat Savitri Purnima 2024 : वट सावित्री व्रत कधी आहे? नेमकी तारीख आणि पूजेची शुभ वेळ जाणून घ्या

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून चातुर्मास सुरू होतो, जो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपर्यंत चालतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार चातुर्मासाची सुरुवात देवशयनी एकादशीपासून होते. यंदा देवशयनी एकादशीचे व्रत १७ जुलै रो...