भारत, मार्च 6 -- आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान अतिशय वेगाने पुढे जात आहे. बाहेरच्या कामाव्यतिरिक्त, लोक आता नातेसंबंध सुधारण्यासाठी याचा वापर करीत आहेत कारण एआय मानवासारखा पक्षपाती असू शकत नाही आणि नात्यातील दोन लोकांमध्ये भेदभाव करणार नाही. एआयच्या मदतीने तरुण जोडप्यांना त्यांच्या नात्याबद्दल तिसऱ्या व्यक्तीकडून किंवा मॅरेज कौन्सिलरकडून भरमसाठ फी भरावी लागत नाही.

असाच एक प्रकार अमेरिकेतून समोर आला आहे. येथे एका तरुण जोडप्याने आपले नाते जपण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर कसा केला आणि या माध्यमातून त्यांच्यात कलह निर्माण करणारे मुद्देही सोडवले. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, चॅट जीपीटी डॉम वर्सासी आणि अबेला बाला यांच्यासाठी मोठा गेम-चेंजर ठरला. लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या ३६ वर्षीय बाला यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली की, आम्ही गेल्या ६ म...