Delhi, फेब्रुवारी 19 -- isro chandrayaan 4 mission plan : चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर जवळपास ६ महिन्यांनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आत आणखी एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत. इस्रोने चांद्रयान ४ मोहिमेसंदर्भात माहिती दिली आहे. या मोहिमे संदर्भात चर्चा सुरू असून त्यावर लवकरच काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली आहे. या मोहिमेची रचना आणि आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आल्याची माहिती आहे. यानंतर, इस्रोने चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीवर माती आणण्यासाठी आता मोहीम हाती घेतली आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी GSLV-F14/INSAT-3DS उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर या मोहिमेची माहिती दिली. स...