Mumbai, फेब्रुवारी 12 -- Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात जीवनाच्या अनेक पैलूंवर चर्चा केली आहे. यासोबतच त्यांनी असे अनेक सल्लेही दिले आहेत, जे जीवनात अंमलात आणल्यास माणूस मोठ्यातील मोठ्या समस्यांनाही तोंड देऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जर तुम्हाला जीवनात फसवणूक टाळायची असेल तर त्यासाठी तुम्ही आचार्य चाणक्य यांच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे.

बहुतेक लोकांसोबत प्रेमात किंवा मैत्रीत फसवणूक होते, त्याचे मुख्य कारण म्हणजे व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. नाते कितीही जवळचे असले तरी, एखाद्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. जर, तुम्ही हे केले नाही तर, दुसरी व्यक्ती तुमच्यावर वर्चस्व गाजवेल. यासोबतच, कोणत्याही नात्यात प्रवेश करण्यापूर्वी, समोरच्या व्यक्तीचे हेतू,...