Mumbai, ऑक्टोबर 7 -- Chanakya Niti for Parents: आपलं मूल मोठं होऊन यशस्वी व्यक्ती व्हावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी पालक लहानपणापासूनच पाया घालायला सुरुवात करतात. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. पण मुलाला यशस्वी बनवण्यासाठी त्याला चांगल्या शाळेत घालणे पुरेसे नाही. कारण शाळेत फक्त शिक्षण मिळेल आणि यशस्वी व्यक्ती होण्यासाठी केवळ शिक्षण पुरेसे नाही. त्यासाठी इतरही अनेक गोष्टींची गरज असते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात मुलांना यशस्वी माणूस बनवण्यासाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांच्यानुसार मुलाला यशस्वी व्यक्ती बनवण्यासाठी त्याचे संगोपन कसे करावे.

आचार्य चाणक्य यांच्या मते, मुलांचे संगोपन नेहमी पूर्ण प्रेमाने आणि काळजीने केले पाहिजे. मुलांना घरात असे वा...