भारत, फेब्रुवारी 27 -- 'चल हल्ला बोल' या मराठी चित्रपटातील प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांची 'रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो...' ही कवितेवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. 'कोण नामदेव ढसाळ?' असा उर्मट सवाल सेन्सॉर बोर्डने केला आहे. सेन्सॉर बोर्डच्या या भूमिकेमुळे चित्रपटाचे निर्मातेच नव्हे तर विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता सेन्सॉर बोर्ड विरोधातच 'चल हल्ला बोल' असा थेट इशारा विविध या सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.

'लोकांचा सिनेमा' या चळवळीच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोक वर्गणीतून 'चल हल्ला बोल' हा सिनेमा बनवला आहे. दलित पँथर, युवक क्रांती दल या चळवळींच्या पार्श्वभूमीवर दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, मुस्लिम, शेतकरी, स्त्रिया आदींच्या शोषणाविरुद्...