Delhi, फेब्रुवारी 12 -- CBSE Board Exams 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत. ही तयारी करत असतांना परीक्षेसंबंधी काही प्रश्न देखील मुलांना पडत आहे. जसे की, नमूना प्रश्न पत्रिकेतून प्रश्नविचारले जातील का ? शब्दमर्यादा ओलांडल्यास गुण कापले जातील का? किंवा, अंतिम निकालात प्री-बोर्ड मार्क घेतले जातात का?

विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सीबीएससीच्या संकेत स्थळावर माहिती देण्यात आली आहे. cbse.gov.in या सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे उत्तरे देण्यात आले आहेत. प्रामुख्याने विद्यार्थ्यांकडूंन वारंवार विचारले जाणाऱ्या १० महत्वाच्या प्रश्न (ए...