New delhi, मे 6 -- Cashless Treatment Scheme for Road Accident Victims: देशभरात रस्ते अपघातांच्या वाढत्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारने मंगळवारी नवीन योजना जाहीर केली आहे. केंद्र सरकारने रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना जाहीर करणारी अधिसूचना जारी केली आहे. या कॅशलेस योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील पीडितांना तात्काळ आणि मोफत उपचार मिळू शकणार आहेत. सरकारने म्हटले आहे की, या योजनेअंतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अनामत रक्कम न भरता दीड लाखापर्यंत उपचार मिळू शकतील. ही योजना ५ मे २०२५ पासून लागू करण्यात आल्याची माहिती ही सरकारने दिली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत राजपत्रित अधिसूचनेनुसार, भारतातील कोणत्याही नामांकित रुग्णालयात अपघात झाल्यानंतर सात दिवसांच्या आत या योजनेचा दावा केला ...