भारत, जानेवारी 30 -- आमच्या कंपनीत आंध्र प्रदेशातून एक मुलगा हेल्पर म्हणून जॉईन झाला होता. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही हुनर असते आणि त्याचे प्रदर्शन करुन शेजारी-पाजारी अथवा ऑफिसमध्ये छाप पाडण्याचे प्रयत्न अगदी स्वाभाविक असतात. हा मुलगाही त्याला अपवाद नव्हता. तो काम चांगले करायचा, त्याबरोबरच इतरांच्या उपयोगीही पडायचा. सहकारी कर्मचाऱ्यांपैकी कुणाला बरे नसेल तर हा जवळच्या पिशवीतून त्यांना औषधे द्यायचा. हळूहळू त्याची प्रसिद्धी वाढू लागली. कामगारांपैकी अनेकजण आजारी पडल्यास डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा या मुलाकडून औषधे घेऊ लागले. औषधांबाबत त्याचा हातगुण असल्याची चर्चा कानोकानी होऊ लागली. एक दिवस आमच्या मॅनेजरनीही या मुलाच्या निदान करण्याच्या आणि उपचारांच्या कौशल्याबद्दल मला सांगितले. त्यांची अपेक्षा होती, की या माहितीमुळे मी खूश होईन.

हा मुलगा ...