Mumbai, जानेवारी 31 -- Budh Grah Gochar In Marathi : प्रत्येक ग्रह आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र बदलत असतो. ग्रहाचे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी शुभ तर काही राशीच्या लोकांसाठी अशुभ सिद्ध होते. आपल्या कुंडलीत ग्रह कोणत्या स्थानावर आहे यानुसार आपल्यावर कसा परिणाम होईल ते ठरते. नवीन वर्ष २०२५ चा दुसरा महिना फेब्रुवारी सुरू होत असून, या महिन्यातही काही ग्रह गोचर करतील ज्याचा राशींवर परिणाम होईल. फेब्रुवारी महिन्यात बुध ग्रह २ वेळा गोचर करणार आहे.

ग्रहांचा राजकुमार बुध च्या राशीबदलाचाही मेष ते मीन राशीवर परिणाम होईल. बुध जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा परिणाम मेष ते मीन राशीवर होतो. पंचांगानुसार बुध फेब्रुवारीमध्ये दोनदा राशी बदलून कुंभ आणि मीन राशीत गोचर करेल. बुधाची राशी दोनदा बदलल्यास काही राशींना आर्थिक लाभ त...