New delhi, जानेवारी 31 -- Budget Session starts : संसदेत आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्यांदाच संसदेला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत याचा उल्लेख केला आहे.

संसदेत आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्यांदाच संसदेला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, "आपल्याला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे". ही २५ वर्षे आपल्या सर्वांसाठी आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कर्तव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत.

१ तास 2 मिनिटे चाललेल्या आपल्या भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतात प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार आहे. हे सरकार न घाबरता काम करत आहे. यासाठी त्यांनी सर्जिकल स्ट्राईक, दहशतवादावरील कठोरता, कलम ३७० आणि तिहेर...