Delhi, जानेवारी 31 -- Budget 2025 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला २०२५ व २६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल हा आज त्या संसदेत सादर करणार आहेत. चालू आर्थिक वर्षातील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना देशासमोरील आव्हानांचे विवेचन या आर्थिक पाहणी अहवालात त्या करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर होणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालात सुधारणा आणि विकासाचा रोडमॅपही देण्यात आला आहे.

मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा आढावा तयार केला आहे. यात पुढील आर्थिक वर्षाबाबत विविध माहिती देण्यात आली असून त्या द्वारे अर्थव्यवस्था आणि विविध क्षेत्रांतील आर्थिक विकासाची रूपरेषा त्यावरून ठरवल...