Delhi, फेब्रुवारी 3 -- Budget Review: अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नव्या करप्रणालीअंतर्गत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील विशेष करसवलत वाढवून ती पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहे. मात्र, वेतनासह भांडवली नफ्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या बाबतीत उत्पन्न १२ लाखरुपयांपेक्षा कमी असले तरी आयकर भरावा लागणार आहे. याचे कारण म्हणजे विशिष्ट प्रकारच्या उत्पन्नावर लागू होणारे प्राप्तिकर नियम.

कलम-८७ अ अंतर्गत सवलतीचा लाभ वेतनातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच देण्यात यावा, असा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. भांडवली नफ्याच्या कक्षेत येणाऱ्या वेतनाव्यतिरिक्त अन्य स्त्रोतांमधून उत्पन्न मिळत असेल तर कर सवलतीचा लाभ मर्यादित राहणार आहे. कर सवलत ही भांडवली नफ्याच्या उत्पन्नावर नव्हे तर केवळ वेतन उत्पन्नावर मिळणार आहे. अल्प...