Mumbai, फेब्रुवारी 1 -- Union Budget 2025 : आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा तात्काळ परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. सरकारी क्षेत्रातील विशेषत: रेल्वे व संरक्षण क्षेत्रातील शेअर आज मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. या कंपन्यांच्या शेअरमध्ये ९ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. बजेटमधील एक घोषणा त्यासाठी कारण आहे.

आर्थिक वर्ष २०२५ साठी सुधारित भांडवली खर्चाचा (कॅपेक्स) अंदाज १०.१८ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भांडवली खर्च मंदावल्यानं ही कपात करण्यात आली आहे. त्याचा थेट परिणाम रेल्वे व संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरवर झाला आहे.

निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चाचं उद्दिष्ट ११.२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवलं आहे. गेल्या वर्षी ११.१ लाख कोट...