Mumbai, जानेवारी 31 -- Union Budget 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी (०१ फेब्रुवारी) २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच अर्थसंकल्पाशी संबंधित मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

निर्मला सीतारामन उद्या सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषण करतील. या भाषणादरम्यान सीतारामन लोकसभेत आगामी आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतूद आणि महसुली अपेक्षांची रूपरेषा मांडतील. कनिष्ठ सभागृहातील त्यांच्या भाषणानंतर अर्थसंकल्पीय कागदपत्रे राज्यसभेत मांडली जातील.

हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल. मध्यमवर्ग कर सवलतीची आणि व्यापारी वर्गाला जीएसटीच्या सोप्या रचनेची अपेक्षा असेल. या अर्थसंकल्...