भारत, फेब्रुवारी 1 -- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. आता यापुढे १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स लागू होणार नसल्याची महत्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली आहे. अर्थमंत्र्यांच्या भाषणावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. 'अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणादरम्यान देशात विकासाचे चार इंजिन असल्याचे सांगितले आहे. कृषी क्षेत्र, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात ही विकासाची चार पॉवर इंजिन असल्याचे सीतारामन म्हणाल्या. असे असले तरी अर्थसंकल्प मात्र पूर्णपणे कोलमडला आहे' अशी टीका काँग्रेस सरचिटणीस, राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी शनिवारी केली.

रमेश म्हणाले, 'अर्थमंत्र्यांनी कृषी, एमएसएमई, गुंतवणूक क्षेत्र आणि निर्यात या चार इंजिनांचा उल्लेख केला. इंज...