Mumbai, जानेवारी 28 -- Union Budget 2025 : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. मोदी सरकारनं सत्तेत आल्यापासून रेल्वे विकासावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेवरील खर्चात मोठी वाढ होऊ शकते. त्यासाठीची तरतूद ३ लाख कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण आणि रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी तसंच, सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत, वंदे भारत स्लीपर, अमृत भारत आणि वंदे मेट्रोच्या उभारणीसाठी मोठी तरतूद करण्याची शक्यता आहे.

रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४-२५ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २ लाख ६५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा सरकार बजेट वाढव...