Mumbai, फेब्रुवारी 1 -- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वैयक्तिक करदात्यांना दिलासा देताना १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. म्हणजेच, १२ लाखांच्या उत्पन्नावर आता शून्य टॅक्स लागणार आहे. त्याचवेळी, सीतारामन यांनी नवीन टॅक्स स्लॅबच्या दरातही बदल केले आहेत. मात्र, या स्लॅबमुळं काही जणांचा गोंधळ उडाला आहे.

सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन स्लॅब दरांमध्ये केवळ ४ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त दिसत आहे. त्यापुढील ४ ते ८ लाखांवरच्या उत्पन्नावर ५ टक्के आणि ८ ते १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर दिसत आहे. मग १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त कसा असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. मात्र, नव्या रचनेत टप्पानिहाय करात कपात करण्यात आल्यामुळं विविध सवलतींनंतर १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर...