Mumbai, जानेवारी 27 -- Income Tax Changes Expectations : केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ जसजसा जवळ येत आहे, तसतसे प्राप्तीकर धोरणांमध्ये संभाव्य बदलांची चर्चा सुरू आहे. तज्ञांनी वैयक्तिक प्राप्तिकरातील महत्त्वपूर्ण बदल, ईव्ही आणि क्रिप्टोवर विशेष कर, गृहनिर्माण सवलती, बचत प्रोत्साहन यासह बऱ्याच शिफारशी केल्या आहेत. या प्रस्तावित सुधारणांचा उद्देश करदात्यांना दिलासा देणं हा आहे.

मध्यमवर्गीयांचं लक्ष प्राप्तिकरातील सुधारणांकडं लागून राहिलं आहे. तज्ञांनी या अपेक्षांचा कानोसा घेऊन त्यास वाचाही फोडली आहे. अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला अपेक्षित प्राप्तिकर सुधारणा पुढीलप्रमाणे.

वैयक्तिक प्राप्तिकराचे दर संभाव्यत: कमी करून मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कर स्लॅबमध्ये सुधारणा करण्याचा विचार केला पाहिजे. प्राप्तिकर प्रणालीअंतर्गत सवलतीच...