Mumbai, जानेवारी 30 -- Budget Expectations : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील घोषणांचा एकूण अर्थव्यवस्थेसह शेअर बाजारावरही तात्काळ परिणाम होत असतो. त्यामुळं शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं त्याकडं बारीक लक्ष असतं.

अर्थसंकल्पापूर्वी दीर्घ मुदतीच्या भांडवली नफा करात कपात करण्यापासून ते प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये सुसूत्रता आणण्यापर्यंत आणि संभाव्य वित्तीय तुटीच्या उद्दिष्टांपर्यंत विविध गोष्टींमध्ये सुधारणा होतील, अशी आशा गुंतवणूकदारांना आहे. पाहूया सविस्तर.

शेअर बाजाराच्या दिशेवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे.

भांडवली नफा कर कमी व्हावा असं प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना वाटत असतं. अशा कपातीमुळं बाजारात तेजीला चालना मिळू शकते, अस...