New delhi, फेब्रुवारी 1 -- Budget2025 memes : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात नव्या कररचनेनुसार १२ लाख रुपयांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली. दरम्यान अर्थसंकल्पात कोणाला काय मिळाले ही वेगळी गोष्ट आहे मात्र नेटीझन्स गंमतीशीर मीम्स तयार करून मध्यमवर्गाची चुटकी घेत आहेत. १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर जल्लोषाचे वातावरण असून नेटिजन्सकडून मीम्सचा वर्षाव केला जात आहे. अर्थसंकल्पानंतर ट्विटर आणि इंस्टाग्रामवर मीम्सचा महापूर आला आहे.

एका यूजरने एआय-जेनरेटेड इमेज शेअर केली आहे, त्यामध्ये निर्मला सीतारामण यांचा चेहरा बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्या'कभी खुशी कभी गम'चित्रपटातील प्रसिद्ध सीनवर मॉर्फ केला आहे. यूजर्स या निर्णयाचे स्वागत करताना "अब तो जिंदगी सेट हो गई" आणि "अर्थमंत्र...