New delhi, फेब्रुवारी 1 -- Rahul Gandhi on union budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यात मध्यमवर्गाला मोठी भेट देत १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर शून्य करण्यासारखी मोठी घोषणा करण्यात आली. काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्पावर निशाणा साधताना ते म्हणाले की, हे गोळीच्या जखमेवर बँड-एड लावण्यासारखे आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, "गोळीच्या जखमेवर बँड-एड. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आपले आर्थिक संकट सोडविण्यासाठी मोठे बदल आवश्यक होते. पण विचारांच्या बाबतीत हे सरकार दिवाळखोर आहे.

Budget 2025: १२ लाखापर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री; सोश...