Mumbai, जानेवारी 31 -- Union Budget News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली उद्या (१ फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गासाठी १० मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत सविस्तर चर्चा करुयात.

अर्थसंकल्प २०२५ मध्ये करदात्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत आणि महिलांपासून तरुणांपर्यंत मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थसंकल्पात प्राप्तिकर सवलतीपासून ते पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्यापर्यंत अपेक्षा आहेत.

बिझनेस स्टँडर्डने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात नव्या करप्रणालीअंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त होऊ शकते. १५ लाख ते २० लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नासाठी...