Mumbai, फेब्रुवारी 1 -- Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (१ फेब्रुवारी २०२५) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार ३.० चा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण काही कारणास्तव ऐकता आले नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. येथे आम्ही तुम्हाला केंद्रीय अर्थसंकल्प आणि संबंधित कागदपत्रे डाउनलोड करण्याच्या सोप्या टीप्स सांगत आहोत. दरम्यान, सर्व अर्थसंकल्पाची पीडीएफ फाईल डाउनलोड कसे करायचे, याबाबत जाणून घेऊयात.

१) सर्वप्रथम, अधिकृत वेबसाइट www.indiabudget.gov.in. वर भेट द्या.

२) वेबसाईट ओपन झाल्यानंतर 'बजेट स्पीच' या सेक्शनमध्ये जा.

३) ज्या वर्षाचे बजेट तुम्हाला पाहायचे आहे, त्या वर्षाच्या टॅबवर क्लिक करा.

४) क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर डाऊनलोड लिंक असलेले पेज ओपन होईल. ...