Mumbai, फेब्रुवारी 12 -- Buddha and Angulimala: तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित कथा, बोधकथा व्यक्तीच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवणाऱ्या आहेत. या कथांमधून व्यक्ती काहीना काही शिकत असते. अशीच एक जगप्रसिद्ध कहाणी आहे अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची.

आताच्या उत्तर प्रदेशात असलेल्या मगध नावाच्या राज्यात अंगुलीमाल नाव्याच्या दरोडेखोराची मोठी दहशत पसरलेली होती. तो लोकांना लुटण्याचे काम करत होता. लुटल्यानंतर तो त्यांची हत्या करत होता. हत्येनंतर मृत व्यक्तीचा हाताचा अंगठा कापून तो गळ्यातील माळेत विणत असे. यावरूनच या दरोडेखोराला अंगुलीमाल असे नाव पडलेले होते. अंगुलीमाल ज्या जंगलाच रहात होता, त्या जंगलाच्या आसपासच्या परिसारातील गावांमधील लोक त्रस्त होते. या दरोडेखोपासून आपली कशी सुटका होईल याची ते वाट पाहत होते. मगधाचा राजाही अंगुलीमाल दरोडेख...