Mumbai, फेब्रुवारी 4 -- Urine Test to Detect Brain Tumor: जपानमधील संशोधकांच्या एका टीमने एक नवीन उपकरण विकसित केले आहे, जे यूरिनमधील म्हणजेच लघवीतील मेम्ब्रेन प्रथिन शोधते, जे रुग्णाला ब्रेन ट्यूमर आहे की नाही हे निर्धारित करण्यात मदत करू शकते. टोकियो विद्यापीठाच्या सहकार्याने जपानच्या नागोया विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक ताकाओ यासुई आणि प्राध्यापक योशिनोबू बाबा यांच्या नेतृत्वाखालील संशोधन गटाने नॅनोवायरचा वापर करून ब्रेन ट्यूमर ईव्हीसाठी एक नवीन अॅनालिसिस प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.

नागोया युनिव्हर्सिटीच्या मते, मेंदूच्या ट्यूमरसाठी जगण्याचा दर हा गेल्या ३० वर्षांपासून बदलेला नाही आणि हे त्याचे उशिरा निदान झाल्यामुळे होते. अनेकदा, बोलण्याची हालचाल कमी होणे यासारख्या न्यूरोलॉजिकल लक्षणांच्या सुरुवातीनंतरच डॉक्टरांना मेंदूतील गाठी आढळ...