भारत, सप्टेंबर 19 -- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. चित्रपटची कथा आणि तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना आवडत आहे. त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या १०व्या दिवशी देखील बक्कळ कमाई केली आहे.

'ब्रह्मास्त्र' प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता चित्रपटाने १० दिवसांमध्ये २०० कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी चित्रपटाने भारतात १६ कोटी ३० लाख रुपयांची कमाई केली आहे. १० दिवसात चित्रपटाने २१५.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. तिसऱ्या आठ...