भारत, सप्टेंबर 18 -- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. त्यानंतर आता चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. पण चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. जभरात चित्रपटाने ३०० कोटी रुपये कामावले आहेत. तसेच भारतात चित्रपटाने २०० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.वाचा: शाहरुख खानच्या लेकाच्या प्रेमात ही अभिनेत्री, शेअर केला फोटो

बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या आठवड्यातील ...