Mumbai, जानेवारी 30 -- Share Market : मागील सहा महिन्यांत आपल्या शेअरहोल्डर्सना तब्बल १९४ टक्के (जवळपास तिप्पट) परतावा देणारी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) संगम फिनसर्व्हनं आता बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. त्यानुसार, कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना ४:१ या प्रमाणात मोफत शेअर्स देणार आहे. म्हणजेच प्रत्येक एका शेअरमागे ४ शेअर्स दिले जाणार आहेत.

बोनस शेअरची रेकॉर्ड डेट ७ फेब्रुवारी २०२५ ही निश्चित करण्यात आली आहे. संगम फिनसर्व्हच्या शेअर्समध्येही चांगली वाढ दिसून येत आहे. गुरुवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३००.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

संगम फिनसर्व्हच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यांत १९४ टक्के वाढ झालीआहे. ३० जुलै २०२४ रोजी कंपनीचा शेअर १०२.१५ रुपयांवर...