Mumbai, फेब्रुवारी 2 -- Bollywood Most Popular Villains : हिंदी चित्रपटसृष्टीत एक प्रसिद्ध म्हण आहे की, 'जगाला हीरो आवडतो, पण कुणी मला खलनायक आवडतो, असं बोलून दाखवावं'. इंडस्ट्रीत अनेक उत्तम सिनेमे बनले आहेत, पण व्हिलनशिवाय हे सिनेमे अपूर्ण राहिले असते. 'गब्बर सिंग' असो वा 'मोगॅम्बो', ही अशी पात्रं आहेत जी कधीच विसरता येणार नाहीत. पण, तुम्हाला माहीत आहे का की, याआधी ही संस्मरणीय पात्रे दुसऱ्या कुणाला ऑफर करण्यात आली होती.

'गब्बर सिंग' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध खलनायकांपैकी एक आहे. अमजद खान यांनी आपल्या दमदार आवाजाने आणि भीतीदायक हावभावांनी या व्यक्तिरेखेला अमर केले. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही भूमिका सर्वप्रथम डॅनी डेन्झोंगपा यांना ऑफर करण्यात आली होती. डॅनी त्यावेळी आपल्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर होते आण...