Mumbai, डिसेंबर 8 -- Mangalprabhat Lodha On BMC Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांत भाजपनं १८२ जागांपैकी तब्बल १५१ जागांवर आघाडी घेत सलग सातव्यांदा बहुमतानं सत्तास्थापनेच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेसचा गुजरातमध्ये सुपडा साफ झाला असून आघाडी कायम राखली तर भाजपनं आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय ठरणार आहे. परंतु आता गुजरातच्या निकालानंतर त्याचे महाराष्ट्रातही पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भाजप नेत्यांनी गुजरातमधील विजयाआधीच जल्लोष करायला सुरुवात केली असून गुजरातप्रमाणेच मुंबई महापालिका निवडणुकीतही विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं आता भाजप आणि शिवसेनेत पुन्हा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये विजयाकडे घेऊन जाणारी मोठी आघाडी मिळाल्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्र...