Mumbai, फेब्रुवारी 4 -- Mumbai Budget 2025 : केंद्र सरकारनं १२ लाखांपर्यंत करमाफी दिल्यानंतर आता मुंबईकरांना दुसरा सुखद धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेनं २०२५-२६ चा ७४,४२७.४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. या अर्थसंकल्पात कोणताही नवा कर प्रस्तावित नसल्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांनी हा अर्थसंकल्प मांडला. कार्यकारी सभागृह अस्तित्वात नसल्यानं प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पीय अंदाज २०२४-२५ मधील ६५,१८०.७९ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा १४ टक्क्यांनी अधिक आहे.

बीएमसीच्या अर्थसंकल्पात कोणताही नवीन कर जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, घनकचरा व्यवस्थापन (एसडब्ल्यूएम) युजर चार्जेस लागू करण्यासाठी महापालिका कायदेशीर सल्ला घ...