Mumbai, जानेवारी 27 -- विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे उमेदवार देण्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच, आता आगामी महापालिका निवडणुकांपूर्वीच उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. आता,महिला उपनेत्याने ठाकरेंची साथ सोडली असून लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत अनवाणी राहणार अशी शपथ घेणाऱ्या व ती तब्बल ७ वर्षे पाळणाऱ्या शिवसेना उपनेत्या आणि महिला विभाग संघटक राजुल शिवबंधन तोडले आहे. राजुल पटेल आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत....