भारत, मार्च 3 -- लोकसभा निवडणुकीच्या आधीच भाजपचे अनेक नेते राजकारणाला रामराम ठोकताना दिसत आहेत. आधी गौतम गंभीर त्यानंतर जयंत सिन्हा यांच्यानंतर चांदनी चौक मतदार संघातील वर्तमान खासदार डॉ. हर्षवर्धन यांनीही राजकारणाला अलविदा केला आहे. रविवारी सोशल मीडिया प्लैटफॉर्म एक्सवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत त्यांनी सक्रिय राजकारणातून बाजुला होण्याची घोषणा केली आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, ३० वर्षाच्या राजकीय करिअरनंतर आता पुन्हा आपल्या व्यवसायाकडे परतण्याची इच्छा आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, कृष्णानगरमधील त्यांचे ENT क्लिनिक वाट पहात आहे.

BJP List : २८ महिला, ५७ ओबीसी चेहरे, ५० वर्षांखालील ४७ उमेदवार; भाजप उमेदवारांच्या यादीच्या ५ महत्वाची वैशिष्ट्ये

भाजपने शनिवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आ...