Mumbai, फेब्रुवारी 16 -- गेल्या काही वर्षापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अन्य पक्षातील नेते भाजपमध्ये सामील होत असून त्यांना पदे दिली जात आहे. राज्यसभेसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या उमेदवार यादीत काँग्रेसमधून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यसभेची लॉटरी लागली. यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. याची खदखद आता बाहेर पडत असूनमहाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे पुत्र चिन्मय भांडारी (Chinmay Bhandari) यांची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाली आहे. यावेळी अगदी स्पष्ट शब्दात चिन्मय भांडारी यांनी आपल्या पोस्टमधून भाजपला सुनावलं आहे.

चिन्मय यांनी वडील माधव भांडारी यांचा राजकीय प्रवास सांगत त्यांनी जनसंघपासून ते अगदी २०१४ पर्यंत त्यांनी भाजपसाठी केलेल्या कार्याच्या यादीच दिली आहे. चिन्मय यांनी म्हटले की, ...