Mumbai, मार्च 21 -- Bill Gates Sachin Tendulkar Wada Pao : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स नेहमीच भारत दौऱ्यावर येत असतात. सध्या ते भारतात आले आहेत. विशेष म्हणजे बिल गेट्स यांनी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्यासोबत वडा-पावचा आस्वाद घेतला.

दरम्यान, हा प्रकार एका जाहिरातीचा टीझर असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण व्हिडिओ क्लिपच्या शेवटी 'लवकरच सेवा देऊ' असे कॅप्शन देण्यात आले आहे.

तथापि, आतापर्यंत सचिन तेंडुलकर किंवा बिल गेट्स यांनी अधिकृतपणे कोणत्याही व्यावसायिक कराराची अधिकृत घोषणा केलेली नाही. हा व्हिडिओ शेअर करताना बिल गेट्स यांनी कॅप्शनमध्ये असेही लिहिले की, "कामावर जाण्यापूर्वी नाश्ता करताना."

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन'च्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त भारतात आले आहेत. येथ...