Bijapur, फेब्रुवारी 9 -- Bijapur Naxal Encounter : छत्तीसगड-महाराष्ट्रराज्याच्यासीमेवर बीजापुर जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये तीव्र चकमक सुरू आहे. रविवारी सकाळपासून ही चकमक सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या कारवाईत३१नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून २जवान शहीद झाले आहेत त्याचबरोबर या कारवाईत२जवानजखमी झाले आहेत.

नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले आहेत. डीआरजी आणि एसटीएफच्या कारवाईदरम्यान २ जवान शहीद झाले, तर २ जवान जखमी झाले आहेत. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे, ज्यात एवढ्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे समू...