Mumbai, मे 30 -- बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस' नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'बिग बॉस १८' संपताच प्रेक्षक त्याच्या पुढच्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता 'बिग बॉस १९' आपल्या स्ट्रीमिंगमुळे चर्चेत आला आहे. सीझन १९ बद्दल सतत नवनवीन अपडेट्स समोर येत असतात. इतकंच नाही तर या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक नावं ही समोर येत आहेत. अशातच आता टीव्ही विश्वातील आणखी एक मोठं नाव समोर आलं आहे. जाणून घेऊया कोण आहे तो?

या फेमस कपलला केलं अप्रोच

आम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहोत ते दुसरे कोणी नसून टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारे अभिनेते राम कपूर आणि त्यांची पत्नी गौतमी कपूर आहेत. 'टेलिचक्कर'ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानच्या 'बिग बॉस १९' या शोसाठी राम कपूर आणि गौतमी कपूर यांना अप्रोच करण्यात...