भारत, जानेवारी 29 -- छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून पाहिल्या जाणाऱ्या 'बिग बॉस १७'चा नुकताच महाअंतिम सोहळा पार पाडला. मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण हे स्पर्धक टॉप ५मध्ये होते. यामध्ये मुनव्वरने सर्वांना टक्कर देत 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले. आता मुनव्वर कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. चला जाणून घेऊया...

'बिग बॉस १७' हा शो जेव्हा पासून सुरु झाला तेव्हा पासून मुनव्वर फारुकी विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. त्याचा गेम हा सर्वांच्या पसंतीला उतरत होता. पण वैयक्तिक आयुष्मातील चढ उतरांमुळे मुनव्वरला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. पण सगळ्या संकटांवर मात करत मुनव्वरने 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले.वाचा: मुनव्वर फारुकीने जिंकला बिग बॉस १७ ...