भारत, फेब्रुवारी 4 -- Bigg Boss 16 Latest Update: छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त शो 'बिग बॉस १६' आता महाअंतिम सोहळ्याच्या दिशेने सरकत आहे. या दरम्यान घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांमध्ये मोठी चुरस रंगली आहे. बिग बॉस १६च्या बक्षिसाची रक्कम वाढवण्यासाठी नुकताच एक फिनाले टास्क आयोजित करण्यात आला होता. बिग बॉसचा हा टास्क इतका भयंकर होता की, तो संपल्यानंतरही त्याचे परिणाम अजूनही दिसत आहेत. या टास्कमध्ये कुणाचा डोळा सुजला तर कुणाला दुखापत झाली, त्यामुळे निम्रित कौर आणि अर्चना गौतम यांच्यात वाद देखील झाले.

टॉर्चर टास्क दरम्यान अर्चना गौतमने तिच्यावर झालेल्या टॉर्चरचा चांगलाच बदला घेतला. अर्चनाने या टास्कमध्ये निम्रित कौर, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांना भरपूर टॉर्चर केले. अर्चनाने किचनमधून हळद आणून तिघांच्या तोंडावर फेकली. यावेळी त्यांच्या डोळ्यात...