Mumbai, फेब्रुवारी 3 -- Bianca Censori Clothes At Grammys 2025 : ग्रॅमी अवॉर्ड्स हा संगीत जगतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक आहे. या सोहळ्यात संगीताचे सूरही ऐकायला मिळतात आणि रेड कार्पेटवर फॅशनचा जलवा देखील पाहायला मिळतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लॉस एंजेलिसमध्ये ग्रॅमी अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते.

या दिमाखदार कार्यक्रमात काही स्टार्स ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आले, तर काहींनी आपल्या फॅशनने सगळ्यांना थक्क केले. यावेळी काही सेलिब्रिटींनी त्यांच्या खास लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यापैकी एक म्हणजे कान्ये वेस्टची पत्नी बियान्का सेन्सोरी .

गायक, रॅपर कान्ये वेस्टची पत्नी बियान्का सेन्सरी ही मॉडेलिंगच्या जगातील मोठे नाव आहे. यंदा तिने पती आणि अमेरिकन रॅपर कान्ये वेस्टसोबत संगीत विश्वातील कलाकारांना सन्मान देणाऱ्या ग्र...