Mumbai, एप्रिल 28 -- Healthy Cold Drink: उन्हाळ्यात सतत काही ना काही थंड खावं आणि प्यावंसं वाटतं. अनेक लोक अशावेळी लोक कोल्ड ड्रिंक्स किंवा रसायने असलेली पेये पिण्यास सुरुवात करतात. ही अशी पेय टेस्टी असली तरी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. पण उन्हाळ्यात तुम्ही दह्यापासून अनेक प्रकारचे पेय बनवू शकता जे चवदार आणि तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच पेयाबद्दल सांगणार आहोत, जे प्यायल्याने तुमची त्वचा चमकदार होईल. तुम्ही मसाला ताक आणि साधे ताक बद्दल ऐकले असेलच. पण तुम्ही बीट ताकाबद्दल ऐकले आहे का? नसेल ऐकले तर आज आम्ही तुम्हाला ते बनवण्याबद्दल आणि त्याचे फायदे याबद्दल सांगणार आहोत. ते बनवायला जास्त वेळ लागणार नाही. यासाठी एक अतिशय सोपी रेसिपी आहे.

१ कप दही

१ बीट

१ कप पाणी

१ टीस्पून खडे मीठ

१ टीस्पून जिरे पावडर

का...