Beed, फेब्रुवारी 5 -- Devendra Fadnavis in Beed: राज्यात सध्या बीडचे राजकारण तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते व आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केले आहे. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे मुंडे हे अडचणीत आले आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याला धनंजय मुंडे हे दांडी मारणार असल्याची माहिती आहे. त्याचं कारण देखील पुढं आलं आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यात विविध विकासकामांच्या उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. यासाठी आज मुख्यमंत्री फडणवीस हे बीड दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थिती राहणार नसल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टी विधानसभा मतदारसंघ...