भारत, नोव्हेंबर 25 -- बांगलादेश दौऱ्यसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी संजू सॅमसन आणि सुर्यकुमार यादव यांची निवड झालेली नाही. यावरून या दोघांचे चाहते नाराज झाले आहेत. तसेच, काही चाहत्यांनी तर BCCI जात पाहून टीम इंडियामध्ये खेळाडूंची निवड करते का? असा प्रश्न विचारला आहे.

फॉर्मात असलेले सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांची बांगलादेशमध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. या दौऱ्यासाठी टीम इंडियातून सूर्या आणि संजूला वगळल्याची बातमी पसरताच ट्विटरवर चाहत्यांनी बीसीसीआयवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. काही वेळातच #CastistBCCI हा ट्रेंडिंग हॅशटॅग बनला आणि हजारो लोकांनी हा हॅशटॅग वापरून पोस्ट लिहिल्या आहेत.

पंतपेक्षा संजूची कामगिरी चांगली

ऋषभ पंत सातत्याने अपयशी ठरत असतानाही त्याला टीम इंडियात सं...