Mumbai, जानेवारी 14 -- Makar Sankranti Holiday : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्टीच्या यादीनुसार मंगळवार, १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत, उत्तरायण पुण्यकाळ, पोंगल, माघे संक्रांत, माघ बिहू आणि हजरत अली यांच्या वाढदिवसानिमित्त देशातील काही भागात बँका बंद राहतील.

अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद-आंध्र प्रदेश, हैदराबाद-तेलंगणा, ईटानगर, कानपूर आणि लखनौ या शहरांमध्ये आज बँकांना सुट्टी असेल. मात्र जर तुम्ही ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग सर्व्हिस अ‍ॅपशी कनेक्ट असाल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. बँकेच्या एटीएममधूनही ग्राहक पैसे काढू शकतात.

विविध राज्यांनुसार देशभरात बँकांच्या सुट्ट्या बदलतात. त्यामुळं ग्राहकांनी आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेत सुट्ट्यांची यादी तपासावी. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) जाहीर केलेल्...