भारत, फेब्रुवारी 4 -- मुंबईच्या फोर्ट परिसरात सुरू असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात चंद्रपूरसारख्या दुर्गम, आदिवासी भागातील बांबूच्या कलाकृती लोकप्रिय ठरल्या. त्यात बांबू दागिन्यांचे मुंबईकरांना अक्षरशः वेड लागल्याचे दिसून आले. चंद्रपूरच्या बांबू कलावंत आणि बांबू कार्यकर्त्या मीनाक्षी मुकेश वाळके यांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या यशस्विनी उपक्रमाद्वारे महोत्सवात सामील होण्याची संधी मिळाली. राज्य कृषी मूल्य आयोगाचे चेअरमन पाशा पटेल, चित्रपट दिग्दर्शक जयंत सोमलकर, निर्मात्या शेफाली भूषण यांनीही स्टॉलला भेट देऊन बांबूपासून बनविलेल्या दागिन्यांच्या कलाकुसरबद्दल माहिती करून घेतली.

'कोण होणार करोडपती' मध्ये सेलिब्रिटी पाहुण्या राहिलेल्या मीनाक्षी या बांबू प्रशिक्षणाद्वारे आदिवासी आणि वंचित महिलांना बांबूपासून वस्तू निर्मितीचे शिक्षण देऊन त्यांना...