Pune, फेब्रुवारी 17 -- Baba Kalyani News : आईची समाधी वडिलांच्या समाधीच्या बाजूला उभारण्यासाठी सुरूवातीला स्पष्ट नकार देणाऱ्या प्रसिद्ध उद्योजक बाबा कल्याणी यांनी गुरूवारी पुणे न्यायालयात मोठा युटर्न घेतला. आईची समाधी बांधण्यावरून बाबा कल्याणी यांची बहिण सुगंधा हिरेमठ यांनी न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर या दाव्याच्या पहिल्या सुनावणीदरम्यान बाबा कल्याणी यांनी समाधीबाबत भावंडांशी चर्चा करायला तयार असल्याची भूमिका वकिलांमार्फत मांडली. परिणामी, न्यायालयाकडून या चर्चेसाठी २० फेब्रुवारीची तारीख देण्यात आली असून या चर्चेनंतरच खटल्याचे भवितव्य ठरेल, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०२३ मध्ये बाबा कल्याणी, सुगंधा कल्याणी व गौरीशंकर कल्याणी यांच्या आई सुलोचना कल्याणी यांचे निधन झाल्यानंतर त्यांची समाधी केशवनगर, मुंढवा येथील कल्या...