New delhi, मार्च 26 -- ATM Withdrawals New Charges : जर तुम्ही एटीएम मशीनमधून (एटीएम) पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. एका रिपोर्टनुसार, आगामी काळात एटीएममधून पैसे काढणे महागात पडू शकते. डीडी न्यूजने मंगळवारी दिलेल्या वृत्तानुसार, १ मे पासून एटीएममधून पैसे काढणे महागात पडणार आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) इंटरचेंज शुल्कात वाढ केली आहे. मोफत व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतरही ग्राहकांनी इतर एटीएममधून पैसे काढल्यास वाढीव शुल्क लागू होईल. इतर बँकांच्या एटीएममधून मोफत व्यवहाराची मर्यादा मेट्रो शहरांमध्ये पाच आणि बिगर मेट्रो शहरांमध्ये तीन आहे. यानंतर व्यवहारावर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. एटीएम इंटरचेंज फी हे एक शुल्क आहे जे एक बँक एटीएम सेवा प्रदान करण्यासाठी दुसऱ्या बँकेला देते. हे शुल्क, सामान्यत: प्रत्येक व्...