Mumbai, जानेवारी 28 -- Maharashtra Govts Big Decision: महाराष्ट्र सरकारने मंगळवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून अटल सेतूवरील टोलदरवाढ पुढील वर्षभर थांबवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वाहनधारकांना आधीप्रमाणे २५० रुपये इतकाच टोल कर द्यावा लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सुमारे २२ किलोमीटर लांबीच्या या पुलाचे उद्घाटन वर्षभरापूर्वी १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या पुलामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा मोठा प्रकल्प पूर्ण झाला आहे. हा पूल दक्षिण मुंबईतील शिवडीयेथून सुरू होऊन एलिफंटा बेटाच्या उत्तरेला ठाणे खाडी ओलांडून न्हावा शेवाजवळील चिर्ले गावात संपतो, त्यामुळे मुंबई आणि एमएमआर परिसरातील ल...